मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली आहे. मात्रसंघटनात्मक बदल न झाल्याने प्रदेशाध्यक्ष पदावर तूर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे यांची प्रभागनिहाय प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली, तर पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड केली.



