
होळीच्या तोंडावर सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढवण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या दिवशी सरकारने दिलेली सवलत आज मागे घेण्यात आली आहे. शनिवार, १ मार्च २०२५ रोजी, इंडियन ऑइलने १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे. तथापि, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १,८०३ रुपयांना उपलब्ध होईल, जो फेब्रुवारीमध्ये १,७९७ रुपयांना होता. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,९१३ रुपये झाली आहे, जी फेब्रुवारीमध्ये १,९०७ रुपये होती. तर मुंबईत १,७५५.५० रुपयांना उपलब्ध होईल. फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत १,७४९.५० रुपये होती. चेन्नईमध्येही त्याची किंमत आता थोडी वाढून १,९१८ रुपये झाली आहे.
