संतोष देशमुख हत्या प्रकरण ९ डिसेंबर २०२४ पासून चर्चेत आहे. कारण याच दिवशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची बातमी समोर आली. वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. दरम्यान या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. आज तो राजीनामा अखेर घेण्यात आला आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रात्रीच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. तसंच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. हा राजीनामा आता झाला आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीम्याबाबत काय म्हटलंं आहे?

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (राष्ट्रवादी) मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा सादर केला आहे. मी त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, तो पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे.” तर छगन भुजबळ यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.