
विक्की कौशल, रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजतोय. रिलीज होऊन 34 दिवस झाल्यानंतरही चित्रपटाची कमाई धमाकेदार आकड्यांमध्ये होत आहे. तसेच, असं दिसून आलं आहे की, हा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅटपेक्षा जास्त कमाई करत आहे.
दंबग भाईजान सलमान खानचा ‘सिकंदर’ ईदला प्रदर्शित होत आहे. याआधी, ‘छावा’ चित्रपटाकडे आता फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. कारण, त्यानंतर बॉक्स ऑफिसवर सिकंदर रिलीज होणार आहे. सिकंदर रिलीज झाल्यानंतर काय होईल, हे येत्या काळात पाहायला मिळेल. पण, आताचं चित्र जर पाहिलं, तर ‘छावा’कडे सिंकदर रिलीज होण्यापूर्वीचाच वेळ आहे. ‘छावा’च्या आताच्या कमाईबद्दल सविस्तर जाणून घेऊयात,…
‘छावा’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘छावा’नं 4 आठवड्यात 552.18 कोटी रुपये कमावले. सकनिल्कच्या मते, 29 व्या, 30 व्या आणि 31 व्या दिवशी चित्रपटाचा कलेक्शन अनुक्रमे 7.25, 7.9 आणि 8 कोटी रुपये होता. 32 व्या आणि 33 व्या दिवशी, चित्रपटाने अनुक्रमे 2.65 कोटी आणि 2.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि एकूण 580.63 कोटी रुपये कमावले. 32 व्या दिवशी चित्रपटाने 2.70 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि यासोबत ‘छवा’चा एकूण कलेक्शन 583.33 कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
‘छावा’नं मोडला सर्वात मोठा विक्रम
‘छावा’नं 34 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘जवान’ (640.25 कोटी) हिंदी चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रेकॉर्डही मोडला. जवाननं 34 व्या दिवशी फक्त 82 लाख रुपये कमावले होते. ज्याचा विक्रम छावा यांनी मोडला आहे.
या चित्रपटाने ‘पठाण’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे ज्याने 82 लाख, ‘अॅनिमल’ या चित्रपटाला 54 लाख आणि ‘गदर 2’ या चित्रपटाला 52 लाख रुपयांची कमाई केली आहे. स्त्री 2 आणि पुष्पा 2 बद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 34 व्या दिवशी अनुक्रमे 2.5 कोटी आणि 2.15 कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच 34 व्या दिवशी ‘छावा’नं कलेक्शनच्याबाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे.
दरम्यान, जरा हटके जरा बच्चे आणि लुका छुपी सारखे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकानं ब्लॉकबस्टर ‘छावा’ बनवला आहे. चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना, विनीत कुमार सिंह आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटात अक्षय खन्ना आणि डायना पेंटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत.
