पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यंदा महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ विद्यार्थी शिष्यवृत्ती कोटा निश्चित केला आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. २२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेली परीक्षा २ लाख ४८ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी दिली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला गुणांची यादी जाहीर करून विद्यार्थ्यांच्या जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक अशी दुरुस्ती असल्यास १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
प्राप्त दुरुस्त्यांचा विचार करून निवड यादी जाहीर करण्यात आली. ही निवडयादी www. mscepune.in आणि https:// mscenmms. in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.




