सांगली : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. राहत्या घरात पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. त्यांचावर सांगलीच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून, पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळं जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सुरेश पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू : सांगली महापालिकेचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश पाटील यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबातील व्यक्तींना सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी हे पाऊल कोणत्या कारणातून उचललं,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.



