गडचिरोली : जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून ४० किलोमीटरवर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत ७ पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या करेगुट्टा जंगल भागात देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी नक्षलविरोधी कारवाई मानली जाते. यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील १० हजार जवानांचा सहभाग आहे. त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा जंगल भागात शेकडो नक्षलवाद्यांना घेरले आहे. पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील भागाला घेरले आहे.
सहा नक्षलवाद्यांची शरणागती
नारायणपूर : छत्तीसगढमधील सहा नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यांच्यावर १७ लाखांचे बक्षीस होते. त्यात नारायणपूर जिल्ह्यात चार तर कबरीधाम जिल्ह्यात दोन नक्षलवादी शरण आले.