पुण्यातील एका अपार्टमेंटमध्ये काम सुरू असताना अचानक पिलर कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चार कामगार खाली पडले असून, त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इसेस अपार्टमेंट येथे काम चालू असताना अचानक एक पिलर कोसळला. या दुर्घटनेत चार कामगार खाली पडले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




