राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तर शरद पवार यांनी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची केली आहे. तर काही दिवसांपूर्वी जाहीर भाषणात जयंत पाटील यांनी मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी समोर येऊन याचे स्पष्टीकरण दिले होते. पण आज त्यांनी अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
जयंत पाटील यांनी राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना महायुती सरकारवर टीका केलीय. त्यांनी, महाराष्ट्र आता उत्तरेतील एखाद्या राज्याचा सारखा झाला आहे. तीन भाषा सुत्र लादण्यादा प्रयत्न झाला हे का झाले तर तिकडच्या राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी हे झाल्याचा टोला लगावला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर देखील भाष्य करताना, राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पण सरकार काही नुकसान भरपाई द्यायला तयार नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
सगळ्या राज्यात जागर निर्माण करण्याचे काम दोन अमोलांनी केले. एक अमोल कोल्हे आणि दुसरे अमोल मिटकरी. पण आज एक इकडे आहे दुसरे तिकडे गेलेत. माझी कोणती संघटना नाही की माझे दुसरे कुठले फाऊंडेशन. माझी राष्ट्रवादी हीच संघटना असून हेच फाऊंडेशन आहे. त्याचेच फळ मला मिळाले असून मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. गेली 25 वर्ष मी काम करत आहे. 2633 दिवस मी प्रदेशाध्यक्ष राहिलो. इतरांची 2 ते 3 वर्षांची टर्म असते. मात्र साहेबांनी मला वारंवार संधी दिल्याचे जयंत पाटील म्हणाले.



