आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले होते. अखेर जयंत पाटलांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच प्रदेशाध्यक्ष पदापासून बाजूला होण्याबाबत भाष्य केलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.15 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. येत्या काळात पक्षवाढीवर भर देण्याचे आव्हान नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंसमोर राहणार आहे.



