अंमलबजावणी संचालनालयाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला भिलाई येथून अटक केली आहे. मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चैतन्य बघेलला अटक करण्यात आली आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने शुक्रवारी चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी नवीन छापे टाकले. या प्रकरणात नवीन पुरावे सापडल्यानंतर, ईडीने भिलाई येथील चैतन्य बघेल यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे वाढदिवशीच चैतन्य बघेल यांना अटक करण्यात आली.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल याला ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात छापे टाकल्यानंतर चैतन्यला अटक करण्यात आली. योगायोगाने, आज चैतन्यचा वाढदिवस देखील आहे. नवीन पुरावे मिळाल्यानंतर ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरात असलेल्या भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी छापा टाकला.
दरम्यान, छत्तीसगड दारू घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. ईडीने एसीबीमध्ये एफआयआर दाखल केला आहे. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की हा घोटाळा २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ईडीला तपासात आढळलं की, हा घोटाळा तत्कालीन भूपेश सरकारच्या काळात आयएएस अधिकारी अनिल तुतेजा, उत्पादन शुल्क विभागाचे एमडी एपी त्रिपाठी आणि उद्योगपती अन्वर ढेबर यांच्या सिंडिकेटद्वारे करण्यात आला होता.