राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे पगार अनेक काळापासून थकलेले होते, हे थकलेले पगार मिळावेत. तसंच भविष्यात नियमितपणे पगार सुरु राहावा या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचं थकीत वेतन देण्याचं तर सरकारनं मान्य केलंच आहे. पण १ ऑगस्टपासून त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
तसंच संबंधित आंदोलक शिक्षकांची आपण स्वतः भेट घेतली. तसंच पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या या शिक्षकांची बाजू लावून धरली. त्यामुळं या दबावाची दखल घेत सरकारनं या शिक्षकांच्या अनुदानापोटी ९७० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, तसंच १ ऑगस्टपासून या शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणाही केली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.



