शिर्डी : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राऊत यांच्यावरील ईडी कारवाईमुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्यातच शरद पवार यांची दिल्लीतील ‘डिनर डिप्लोमसी’ यानंतर त्यांनी घेतलेली नरेंद्र मोदींची भेट, यामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत असताना आणखी वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळालं.
२०१९ ला नगरची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी होत होती. मात्र, विखे पाटील हे त्यांचे पुत्र सुजय विखेंना काँग्रेसमधून जागा देण्यावर ठाम होते. अखेर विखेंनी भाजपात प्रवेश केला. आघाडीला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादीविरोधातच दंड थोपटले. मात्र, आता विखे आणि पवारांमधील विस्तव गार झाला असे म्हटले जाते. अजित पवार शिर्डीत कार्यक्रमासाठी कोपरगावात एका कार्यक्रमात सुजय विखे देखील स्टेजवर उपस्थित होते. गृहमंत्री वळसे पाटील यांचं भाषण सुरू होतं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानात काहीतरी सांगायचे पुन्हा पुन्हा प्रयत्न केला या वेळेला अजित पवार यांनी हात जोडले.


