कोल्हापूर : लहान मुली, मुलं, महिला, वृद्धा यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकदा समोर येत असतात. मात्र मुक्या प्राण्यांनाही आपल्या वासनेची शिकार बनवल्याची राज्यातील अत्यंत किळसवाणी घटना समोर आली आहे. चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात घोरपडीवर बलात्कार करण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून आरोपीला पकडलं आहे. शिकारीसाठी आल्यानंतर आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
शिकारीसाठी आलेल्या तिघा तरुणांच्या हाती एक घोरपड लागली होती. त्यानंतर यापैकी एका तरुणाने मुक्या जीवासोबत धक्कादायक कृत्य केलं. कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात घोरपडीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे