मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाची रात्रीपर्यंत यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. मात्र, मध्यरात्री देखील हा हायव्होल्टेज ड्रामा सुरूच राहिला. आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी थेट पोलिसांवरच जीविताला धोका असल्याचा आरोप केला. यानंतर आझाद मैदानावरून पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढल्यानंतर जमावानं थेट सीएसएमटी स्थानकामध्ये ठिय्या मांडला आहे.
https://maharashtramaza.online/?p=153469
शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी जमावाला भडकावल्याप्रकरणी आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखाल करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंदोलकांना शांतता राखून सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. न्यायालयाने देखील २२ तारखेपर्यंत सर्व एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.



