शुक्रवारी सायंकाळी सातारा तालुक्यासह कराड तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले असून पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यात यंदा होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला सर्व संच अवकाळी पावसामुळे अस्ताव्यस्त झाला आहे.












