नारायणगाव (जुन्नर) – महावितरणचा कंत्राटी कामगार स्वतः च्या घरातील वीज मीटरमधून वीज चोरी करीत आहे. वीज ग्राहकांना सुद्धा वीज चोरीसाठी मदत करत असल्याची तक्रार स्थानिक वायरमनने महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली.
या वादातून कंत्राटी कामगार व वायरमन या दोघांमध्ये नारायणगाव (ता. जुन्नर) येथील टोमॅटो उपबजारात ‘फ्री स्टाईल’ कुस्ती झाली. या कुस्तीत वायरमनने मात्र कंत्राटी कामगाराला चितपट केले. विशेष म्हणजे ‘फ्री स्टाईल’ कुस्ती महावितरणच्या दोन शाखा अभियंत्यांसमोर झाली.


