livetvtv9 logo news
मराठी
TOP 9
ताज्या बातम्याIPL 2022महाराष्ट्रराजकारणमुंबईपुणेक्राईमक्रीडामनोरंजनलाईफस्टाईलफोटो गॅलरीव्यवसायट्रेण्डिंगहेल्थराष्ट्रीय
TRENDING
#Agriculture#Corona Update#Special Story#Knowledge#Covid Tracker#राशीभविष्य#अध्यात्म बातम्या#शिक्षण#करिअरयूटिलिटी बातम्या
Marathi News » Latest news » ‘Homeowners have the right to own a home. It is up to him to decide who to sell the house to Permission of the Society
आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा
घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही.
महादेव कांबळे Updated On – 12:02 am, Wed, 13 April 22
आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही
Image Credit Source: TV9
Subscribe to Notifications
मुंबई : ‘घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी? घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.जितेंद्र आव्हाड यांच्या या निर्णयामुळे घर विक्री करताना घरमालकांना त्याचा फायदा होणार आहे.
ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केल आहे. तसंच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रथा मोडीत काढली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. घराची विक्री करताना, त्याचा व्यवहार करताना सोसायटीची परवानगी लागत असल्याने वेळ वाया जात होता, आता या निर्णयामुळे घरमालकांना त्यांचे घर विकताना कमी त्रास सोसावा लागणार आहे.


