बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीकडून गावातील शेतकऱ्यांना ग्रामनिधी अंतर्गत सोमवार दि.१८ एप्रिल रोजी शेतीच्या कामासाठी उपयुक्त औजारांचे वाटप करण्यात आले गावातील प्रत्येक कुटुंबाला घमेल व फावडे यांच्या वाटपाच्या कार्यक्रमाची आजपासून सुरुवात करण्यात आली.
निसर्ग व तोक्ते चक्रीवादळात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याला हातभार लावण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधी अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना एकून अकराशे घमेल व फावडे वाटप करुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मदतीचा हा छोटासा उपक्रम राबवण्यात आला.
याप्रसंगी सरपंच उदय बापट, उपसरपंच सिद्धी कोसबे,ग्राम पं.सदस्य प्रकाश दातार, सुहास मार्कंडे,गीता वाणी, तृप्ती चोगले ग्रामसेवक शंकर मयेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.



