मुंबई : FIR रद्द करावा या मागणीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानं त्यांना दणका दिला असून त्यांना फटकारत याचिका फेटाळून लावली. न्या. पी. बी. वरळे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठां हा निर्णय दिला.
राणा दाम्पत्यानं तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती ती हायकोर्टानं फेटाळून लावली. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत, त्यामुळं दोन एफआयआर दाखल करण्याची मुंबई पोलिसांची भूमिका योग्य आहे. यामधून राज्य सरकारचा हेतूही स्पष्ट होतोय. दोन्ही प्रकरणांचा भिन्न तपास होणं आवश्यक आहे. मात्र, जो दुसरी एफआयआर आहे यामध्ये जर राणा दाम्पत्यावर कारवाई करायची असेल तर दोन्ही आरोपींना ७२ तास आधी नोटीस देणं मुंबई पोलिसांसाठी बंधनकारक असेल, थेट जाऊन त्यांना कुठलीही कारवाई करता येणार नाही, असं होयकोर्टानं म्हटलं आहे.



