येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांची २ कोटी रुपयांची पेटिंग खरेदी करण्यासाठी माझ्यावर दबाव आला होता, असा आरोप राण कपूर यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात केलाय. ईडीने विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, पेंटिंगच्या विक्रीतून आलेले २ कोटी रुपये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या न्यू यॉर्कमधील उपाचारासाठी वापरण्यात आल्याचा दावाही राणा यांनी केलाय.
राणा कपूर ईडीसमोर म्हणाले, “तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटलं होतं की प्रियंका गांधी यांच्याकडील चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्याकडील पेटिंग खरेदी करण्यास नकार दिल्यास गांधी कुटुंबासोबत चांगले संबंध तयार करण्यास अडचण येईल. तसेच पद्मभूषण पुरस्कार मिळण्यातही अडसर येईल.




