मुंबई : बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. समाजाच्या हितासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असं आवाहन करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
यावेळी आठवले म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही माणूस निवडून आला नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कुणी वंचितचे नाव देते कोणी इतरांचे. पण मी कायम रिपब्लिकन राहणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.


