ठाणे : सध्या लग्न सराई सुरु झाली आहे. लग्न म्हटले की दिमाखात आणि ग्रॅण्ड एन्ट्री करण्याची पद्धत सध्या पडली आहे. आपले लग्न आणि त्यातली नवरा-नवरीची एन्ट्री लक्षात राहावी याकरिता लाखोंचा खर्च केला जात आहे. पण काही लोक आज देखील आपला साधेपण जपून आहे. त्याकरिता ते आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पाहा व्हिडिओ- https://twitter.com/saamTVnews/status/1526522526716702720?t=mxbErwglCQeTYTnY7Dpvqg&s=19
यामध्ये नवरीने चक्क बैलगाडीतून लग्नमंडपात एन्ट्री केली आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यातील दिव्यामधल्या दातिवली गावात सुनील पाटील यांच्या कन्येचा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये नवरी हेमांगीने चक्क बैलगाडा शर्यतीतल्या बैलगाड्यात बसून लग्नात एन्ट्री केली आहे. यावेळी वऱ्हाडी मंडळींनी तिचं जोरदार स्वागत केले आहे.