मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पुण्यात कार्यक्रम होता. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत.(2/2)@CPPuneCity
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) May 17, 2022
राज्य महिला आयोगानं काय म्हटलं? -केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत, असं महिला आयोगानं म्हटलं आहे.