नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेत्यांचं निवृत्तीचं वय निश्चित करण्यात यावं आणि निवृत्तीचं वय ६५ वर्षे असावं, अशी सूचना युथ काँग्रेसनं राजस्थनातील उदयपूर इथं सुरु असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. पण २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल, असं सुत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं म्हटलं आहे.
तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा चिंतन शिबिर होत आहे. या शिबिराला ४३० काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी काँग्रेसनं पक्षाचा सहा कलमी कार्यक्रम तयार केला असून तो हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजकारण, संघटना, शेतकरी-कृषी, युवांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि कल्याण-आर्थिक असे विविध विषय हाताळण्यासाठी सहा कमिटी तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांनी आपला कार्यक्रम सोनिया गांधींकडे सोपवला आहे.