बारामती, दि.१७ मार्च : मोबाईल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठीसुद्धा प्रीपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा राज्यसरकार विचार करीत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जेवढ्या पैशांचा रिचार्ज केला जाईल, तेवढीच वीज संबंधितांना वापरता येईल. तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरावी लागेल. जो वीज बिल नियमितपणे भरतो, त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत, त्यांचा भार वीज बिल भरणाऱ्यांवर बसतो. अलीकडे विजेची चणचण भासायला लागली आहे.



