नवी दिल्ली : देशात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चौथ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच हवाई वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीएने (DGCA) विमानतळावर आणि प्रवासादरम्यान काही नियम लागू केले आहेत.
DGCAने विमानतळावर आणि विमानाने प्रवास करताना मास्क सक्तीचा केलाय. गेल्या आठवड्यात हायकोर्टाने फटकारल्यानंतर DGCA ने नवीन नियमावली जारी केली आहे. मुंबईत मागील पाच दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात बुधवारी 2,701 नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदली गेली – जवळपास चार महिन्यांतील सर्वात जास्त – त्यापैकी 1,765 रुग्ण मुंबईतील होते. राज्यात मंगळवारी 1,881 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवली गेली, जी मागील दिवसाच्या तुलनेत 81 टक्क्यांनी अधिक आहे. त्यापैकी 1,242 मुंबईत आढळून आले, जे सोमवारच्या संख्येच्या जवळपास दुप्पट आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी B.A.5 प्रकारातील एक प्रकरण नोंदवले गेले.




