औरंगाबाद : भाजपाला सत्ता असताना सुचत नाही आणि सत्ता गेल्यावर एकदम यांच्या अंगात येतं. संभाजीनगर कधी करणार, संभाजीनगर कधी करणार? हे कोणी सांगायचं आपल्याला, त्यांनी? संभाजीनगरचं वचन माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुख हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलंय. ते मी विसरलेलो नाही, मी विसरणार नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही असा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
आपल्यामध्ये आज मला आई तुळजा भवानीचे रूप दिसते आहे..
– शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे #UddhavThackeray #Shivsena pic.twitter.com/62Q3uMf8eY
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 8, 2022
ते बुधवारी (८ जून) औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. ठाकरे पुढे म्हणाले की, संभाजीनगर कधी करणार असं जे ओरडताय, बोंबलताय त्यांना मला सांगायचं आहे की जवळपास एक-दीड वर्ष झालंय. कॅबिनेटने मान्यता दिलीय. एक सुरुवात म्हणून माझ्या या संभाजीनगर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्र सरकारला दिलाय. का होत नाही अजून? तुमच्याकडे काही दिलं की झाकून ठेवायचं आणि आम्ही काही केलं नाही तर बोंबलत सुटायचं हा आक्रोश होऊ शकत नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.



