सातारा : संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच. साताऱ्यात उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. त्यावेळी पत्रकारांनी खासदार उदयनराजे यांना संजय राऊत यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केलेल्या टीकेवर विचारण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.
उदयनराजे भोसले यांनी राऊत यांचा उदयनराजे स्टाईलमध्ये इशारा दिला. संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच.




