नवी दिल्ली, 10 जून : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं शुक्रवारी निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
परवेज मुशर्रफ हे 2001 ते 2008 पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. याशिवाय ते पाकिस्तानचे आर्मी प्रमुखही होते. भारताविरोधात झालेल्या कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांनाच जबाबदार धरलं जातं. बातमी अपडेट होत आहे.