मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधीमंडळातील लांबलेल्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी करण्यास सुरुवातही झाली नव्हती. त्यामुळे विधानभवन परिसरात राजकीय नेत्यांचा रात्रीस खेळ चाले अशी आवस्था झाली होती.
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी कोणी व का थांबवली? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसेच “आधी ईडीचा डाव फसला, त्यामुळे भाजपाने आता रडीचा डाव” सुरू केल्याचा आरोपही केला. त्यांनी ट्वीट करत आपली भूमिका मांडली. तर निवडणूक आम्हीच जिंकू, जय महाराष्ट्र! असे सूचक ट्विट केले आहे.
सोशल मीडियावर राज्यसभा निवडणुकीच्या अगोदर काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पहाटेच्या शपथ विधीनंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या अपडेट दाखविण्यासाठी कासावीस झाला आहे. मागील दोन दिवसांपासून सर्व आमदार कुठे आहेत. काय करतायत आदी वारंवार बातम्या दाखवत या निवडणुकीत रंजकता निर्माण केली आहे. २४ वर्षात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी निवडणूक होत आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरस मीडियाने लावून दिली आहे.