इंदौर, 16 जून : आपला लाइफ पार्टनर दुसऱ्या कुणाशी तरी संबंध ठेवत आहे, दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करत आहे हे कुणालाच सहन होणार नाही. काही लोक तर असे असतात की त्यांना आपल्या जोडीदाराने दुसऱ्या कुणाशी मैत्री केलेली किंवा साधं बोललेही आवडत नाही.
अशा लोकांना राग आल्यावर काय करतील याचा नेम नाही, असंच मध्य प्रदेशमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात आपल्या बायकोशी बोलणाऱ्या तरुणाचा प्रायव्हेट पार्ट नवऱ्याने कापला आहे. इंदौरच्या गांधी नगरमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने एका तरुणाचा गुप्तांग कापला आहे. शेजारी राहणारा तरुण आपल्या बायकोशी बोलत असल्याने एका व्यक्तीला राग आला.
या रागात त्याने आपल्या बायकोमार्फतच त्या तरुणाला घरी बोलावलं. त्याला मारहाण केली आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला आहे. हे मुलीच्या साखरपुड्यानंतर 46 वर्षीय आईने जावयाशी बांधली लग्नगाठ; 4 वर्षांनंतर हेल्पलाइनवर कॉल केला अन्… ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला त्याचं नाव अजय आहे. त्याच्या शेजारी राहणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीच्या पत्नीसोबत त्याची मैत्री होती.
गेल्या तीन महिन्यांपासून दोघं एकमेकांशी बोलत होते. हे सुभाषला आवडत नव्हतं. दीड महिन्यांपूर्वी यावरून सुभाष आणि अजयचं भांडणही झालं. त्यानंतर अजयने सुभाषच्या बायकोशी बोलणं बंद केलं.
पण आता काही दिवसांपासून ते दोघं पुन्हा बोलू लागले. त्यांना आपसात बोलताना सुभाषने पाहिलं आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने काही तरी कारण देत आपल्या बायकोला अजयला घरी बोलावायला भाग पाडलं. सुभाषच्या बायकोने अजयला आपल्या घरी बोलावलं.
जेव्हा अजय त्यांच्या घरी आला तेव्हा सुभाष आणि त्याची बायको दोघांनीही त्याला एका खोलीत बंद करत त्याला मारहाण केली. सुभाषने चाकूने अजयचा गुप्तांग कापून टाकला. हे ‘तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता’ म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने 10 वार, बीडमधील घटना त्यानंतर अजयला तात्काळ एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जातं आहे. लल्लूरामच्या वृत्तानुसार या प्रकरणाचा गांधीनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.




