बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे (महाराष्ट्र बोर्ड) यांच्याकडून मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल १७ जून रोजी जाहीर झाले.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालयाचा निकाल ९०.६७% लागला या शाळेतील एकूण १०७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील श्रुती बाबासाहेब येळमंते ९४.८० % गुणांसह प्रथम,सुजल मकरंद जाधव ९४.६० % गुणांसह द्वितीय तर पार्थ रविंद्र दिवेकर याने ९३.६०% गुण मिळवून तृतिय क्रमांक पटकावला.
उत्तिर्ण झालेले इतर विद्यार्थी सुध्दा चांगल्या टक्केवारीने पास झाले आहेत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीने विद्यांर्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम झाला होता गेल्या वर्षी अंतर्गत मुल्यमापनानुसार निकाल लावण्यात आला होता.कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेची टांगती तलवार असताना या वर्षी परीक्षा आॕफलाईन की आॕनलाईन होणार याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना आॕफलाईन परीक्षा व्यवस्थित पार पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं शासनाने आॕफलाईन परीक्षेच्या घेतलेल्या निर्णयाचं सर्व हुषार विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून स्वागत केलं गेलं कारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची खरी कसोटी ही प्रत्यक्ष परीक्षेत असते याची जाण पालकांना होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे, संबधीत शिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



