मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लिलावतीमध्ये आहेत. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याआधी दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. “माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीससाहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकी नंतर फडणवीस साहेब एकटे पडतील. भोंगा अजुन अर्धवट आहे. @mnsadhikrut @BJP4Maharashtra @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 19, 2022
राजसाहेब लवकर बरे व्हा कारण…
दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेवर ट्विट केलं आहे. राज ठाकरे लवकरात लवकर बरे व्हा, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. तर पण त्यामागं कारणही दिपाली यांनी स्पष्ट केलंय. आज विधान परिषदेची निवडणूक होतेय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकटे पडतील, त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हा, असं दिपाली म्हणाल्या आहेत. शिवाय भोंगा प्रकरणाचाही त्यांनी संदर्भ दिला आहे. भोंगा अजून अर्धवट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


