मुंबई : राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पाचवी जागा निवडून आणण्यासाठी आमच्याकडे एकही उमेदवार नव्हता, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कुणाला किती मतदान?
प्रवीण दरेकर (भाजपा)- २९
श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३०
राम शिंदे (भाजपा)- ३०
उमा खापरे (भाजपा)- २७
प्रसाद लाड (भाजपा)- २८
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)- २९
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)- २८
आमश्या पाडवी (शिवसेना)- २६
सचिन अहिर (शिवसेना)- २६
भाई जगताप (काँग्रेस)- २६
चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)- २२ (पराभूत)



