जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आले. लष्कराचं ‘ऑपरेशन रक्षक’ सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले.
शहीद जवान सुरज प्रताप शेळके तीनच वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला झालं होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षकदरम्यान वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. शेळके कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत अशा शब्दात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सुरज शेळके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




