मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच काय तर रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा देखील रंगलेल्या. मात्र पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे वक्तव्य रामदास कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना राम कदम पूर्णविराम दिला आहे.
रामदास कदम म्हणाले, मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत सेनेसोबतच असणार आहे.



