मुंबई : बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं आहे. या आमदारांनी त्यांचं मत मांडलं नाही, तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. आजपासून सर्वांना नोटिसा बजावण्यात आली आहे. या आमदारांना सोमवारी 27 जूनपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या नोटिशीला उत्तर न दिल्यास अपात्र ठरवण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर आता हे बंड मोडून काढण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यासाठीचा अर्ज विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आला होता. त्यानंतर आज विधानसभा उपाध्यक्षांनी 16 बंडखोर आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना आता सोमवारी 27 जूनपर्यंत 5.30 वाजेपर्यंत नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. या कालावधीत नोटिसीला उत्तर न दिल्यास या नोटिसीवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.



