मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे काल दर्शन घेतल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी यवत या ठिकाणी आल्या होत्या आणि यावेळी त्यांनी शिवसेनेतून गुवाहाटीत गेलेल्या आमदारांचा पळकुटे आणि भगोडे असा उल्लेख करून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून आपली स्वतःची “शिवसेना बाळासाहेब ठाकरे” असा पक्ष काढला असून यावर सुप्रिया सुळे यांनी आपले पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माणुस कर्तुत्वाने मोठा होत असतो नावाने नाही असं म्हणत बाळासाहेबांनी शिवसेनेच्या उत्तराधिकारी केव्हाच ठरवला होता आणि त्यांच्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी चालवावी अशी त्यांची इच्छा होती, असं त्या म्हणाल्या.



