मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणाचा वापर करून सीमेवरील सर्व सैन्याचा फौज फाटा मुंबईत दाखल केले आहे. तर अनेक शिवसैनिकांना जेरबंद करण्याची योजना ही सुरू झाली आहे. उद्या पलायन केलेले सेनेचे आमदार मुंबईत येणाऱ त्यावेळी सामान्य शिवसैनिकांच्यात दंगल होवू नये व सामान्य शिवसैनिकांची रक्त सांडू नये. यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे फेसबुक लाईव्ह द्वारे दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ते म्हणाले उद्या मुंबईत लोकशाहीचा पाळणा हलणार आहे केंद्रीय यंत्रणेकडून केंद्रीय राखीव दलाचे सर्व यंत्रणा वापरले आहेत. अगदी सीमेवरून ही सैन्य मुंबईत मागवला आहे तसेच त्यांनी इतर देशातून सैन्य मागवावे कारण उद्या मुंबईतील लोकशाहीचा पाळणा घालणार आहे. त्याचा गुलाल आणि पेढ्याचा आनंद त्यांनी घ्यावा. मात्र यामध्ये माझा सामान्य शिवसैनिक भरडला जाऊ नये, त्याचं रक्त सांडू नये यासाठी मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो अशी भावना उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना दिली.



