मुंबई: उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आजपासून एकनाथ शिंदेच्या शिंदेशाहीला सुरूवात झाली. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, असे म्हणत आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत
महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा.



