मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, एकनाथ शिंदे बंड करु शकतात याची तब्बल चार वेळा माहिती ही स्वत: शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गृहखात्याकडून चार ते पाच वेळा माहिती देऊन देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून हालचाल न झाल्याने, दुर्लक्ष केल्यानं सरकार पडलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे बंड करु शकतात अशी माहिती चार वेळा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच राज्याच्या गृह खात्यानेही या संबंधी चार-पाच वेळा इशारा दिला. पण त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं, त्याचा हा स्वभाव आणि गाफीलपणा यामुळे राज्यातील सरकार पडलं अशी माहिती सुत्रांनी दिली.
सरकारविरुद्ध एवढं मोठं षडयंत्र होत असताना इंटेलिजन्सच्या लोकांनी एकही मोठी सूचना सरकारला न देणे हे बरेच काही सांगून जाते. मविआ सत्तेत आल्यावर IAS, IPS अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या होणे अपेक्षित होते, जे अजिबात झाले नाही. फडणवीसांच्या जवळ असणारे अधिकारी आहे तसे भाजपधार्जिणे काम करत राहिले आणि त्यात मविआ सरकारचा घात झाला. Pegasus आणि मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाला खूप हलक्यात घेतले गेले आणि परिणती इंटेलिजन्स नाकाम ठरण्यात झाली.



