नवी दिल्ली : हैदराबादमध्ये भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदींनी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधित केले. त्यानंतर आता या शहराचे नावही बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान म्हणाले की हैदराबाद हे भाग्यनगर आहे जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
हैदराबाद हे भाग्यनगर आहे. ज्याचे आपल्या सर्वांसाठी महत्त्व आहे. सरदार पटेल यांनी अखंड भारताचा पाया घातला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याचे भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले.