मुंबई : आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही’. ‘तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं’, आमचा बंड नाही, हिंदुत्वाशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही उठाव केला आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी यांनी विधानसभेत हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चुप्पी बाळगून असलेल्या गुलाबराव पाटलांनी अखेर मौन सोडत सभागृह दणाणून सोडले.
आमदार गुलाबराव पाटील आजच्या बहुमताच्या चाचणीनंतर सभागृहात बोलताना मौन सोडले. गुलाबराव पाटलांनी यावेळी आदित्य ठाकरेंसह संजय राऊत यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. कधी आक्रमक होऊन तर कधी आपल्या शायरीतून त्यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेबांनी टपरीवाल्यांना, रिक्षावाल्यांना आमदार केलं, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही शिवसेना सोडली. जनतेचे काम करण्यासाठी सत्ता हवी असं बाळासाहेब सांगायचे, मात्र आमच्यावर टीका केली गेली. आम्ही बंड नाही, उठाव केला आहे. सत्तेचं केंद्रीकरण बाळासाहेबांनी केलं आहे, हिंदुत्वाचा रक्षण करणार पक्ष म्हणजे शिवसेना , जे मिळालं ते बाबासाहेबांच्या आशीर्वादानं असेही ते यावेळी म्हणाले


