मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे बंडखोरी करून गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्यासोबत फोनवरून संवाद साधताना “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा शब्दात केलं होतं.
त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या डायलॉगची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शहाजीबापू पाटील अखेर १५ दिवसांनी आपल्या मतदारसंघात परत आले आहेत. यानंतर आता त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी आपले पती शहाजीबापू पाटल यांच्यासाठी एक उखाणा घेतला आहे.
उखाणा घेताना त्यांनी म्हटलं की, असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे.” त्यांचा हा ‘ओके मदी’ घेतलेला उखाणा सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.



