पुणे : मुख्य राज्य महामार्ग क्र. 15 महाड ते पंढरपूर (नवीन घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 DD) चा धोकादायक भाग किमी 81/600 ते किमी 87/00 वरंधा घाट रस्ता पावसाळ्यात 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पिवळ्या, केशरी व लाल सिग्नल दरम्यान दुचाकी, तीनचाकी व हलकी वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रस्ता बंद राहणार आहे. पुणे-पिरंगुट-मुळशी-ताम्हिणी घाट-निजामपूर-माणगाव-महाड असा पर्यायी मार्ग असावा, असे आदेशात म्हटले आहे.




