पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला आहे. पण अद्याप या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या प्रार्श्वभूमीवर गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना यावेळी मंत्रीपद देऊ नये, असं अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं म्हणणं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे.
शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे .राज्यपालाच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्लीदौरा अचानक रद्द होणे आणि शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे ? महाराष्ट्रात लवकरच महाभारत.@TV9Marathi @abpmajhatv @saamTVnews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 27, 2022
त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारावरून देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, “अशीही माहिती समोर येत आहे की, अमित शाह किंवा केंद्रातील भाजपाच्या हायकमांडचं असं म्हणणं आहे की, मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे लोकं मंत्री म्हणून काम पाहत होते, त्या लोकांची यावेळी पुनरावृत्ती नसावी. त्यामुळे बंडखोर आमदार आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील माजी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे



