औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने (ED) अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी, अरे भोंगा नीट करा… माझा आवाज येतोय का? (येतोय येतोय… जनतेतून आवाज) आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला.
राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ईडीच्या हातात आहे. त्यामुळे चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला? असं राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.



