मुंबई : संजय राऊतांना झालेल्या अटकेटी प्रक्रिया मागच्या सहा महिन्यापासून सुरू होती. चार वेळा नोटीस देण्यात आली. नोटीसला उत्तर न देणे , हजर न राहणं, त्यामुळे राऊत अडचणीत आले. कदाचित संजय राऊतला जास्त आत्मविश्वास होता की माझ्यावर काय होणार नाही परंतु ही अशी संस्था आहे की, पूर्ण कागपत्र घेतल्याशिवाय कुणावर कारवाई करत नाही. त्यांचा हा आत्मविश्वासच नडला अन् त्यांना अटक झाली असं शिंदेगटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
खासदार संजय राऊतांवर ईडीची कारवाई झाली, त्यापेक्षा आम्हाला शिवसेना फोडणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई झाली याचा थोडा आनंद अधिक आहे, असंही शिरसाटांनी म्हटलं. संजय राऊतांची ईडी चौकशी आणि झालेली अटक या सगळ्यावरून शिरसाट यांनी निशाणा साधला आहे.
“मला आश्चर्याचा धक्का यावर बसला की त्यांच्याकडे दहा-अकरा लाख रुपये सापडले आहेत आणि त्यावर एकनाथ शिंदेंचं नाव होतं. म्हणजे रामाचं मंदिर उभारण्यासाठी शिंदेसाहेबांनी दिलेले पैसे तेही या माणसाने घरी ठेवले काय की, जैसा करेगा वैसा भरेगा या उक्तीनुसार संजय राऊतांची वेळ आलेली आहे असंही शिरसाट म्हणाले.



