मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार येऊन महिना लोटला. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जातेय. अशावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्वाची बातमी सूत्रांनी दिलीय. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यामधील 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?
- गुलाबराव पाटील
- उदय सामंत
- अब्दुल सत्तार
- दादा भुसे
- शंभुराज देसाई
भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- गिरीश महाजन
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे पाटील
- आशिष शेलार
- प्रवीण दरेकर



